नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळली आहे. कार्तिक निवृत्तीचा विचार करत असल्याने चाहते चिंतेत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो स्टेडियम मध्ये उभा दिसत आहे, तो एकटक मैदानाकडे बघताना दिसत आहे, हा व्हिडिओ मागून शूट केलेला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना 37 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतासाठी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली, आणि असे केल्याचा अभिमान वाटतो…माझ्या आयुष्यातील अनेक अविस्मरणीय क्षण, जे मला नेहमी आनंद देत राहतील.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक सहकारी खेळाडूंसोबत कुटुंबासोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो हातमोजे घातलेलाही दिसत आहे. मैदानात आकर्षक फटके मारतानाही. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये तो सहकारी खेळाडूंसोबत फिरतानाही दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो पत्नी, मूल आणि आई-वडिलांसोबत दिसत आहे.

दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

दिनेश कार्तिकने भारतीय संघासाठी 180 सामने खेळताना 169 डावात 3463 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 42 डावांमध्ये 25.0 च्या सरासरीने 1025 धावा केल्या आहेत, 94 सामन्यात 30.21 च्या सरासरीने 79 डावात 1752 धावा केल्या आहेत आणि 60 T20 सामन्यांमध्ये 48 डावांमध्ये 26.38 धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द

दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 229 सामने खेळताना 208 डावात 26.85 च्या सरासरीने 4376 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 20 अर्धशतकांची खेळी झाली आहे. आयपीएलमध्ये कार्तिकचा स्ट्राइक रेट १३२.६५ आहे.