छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडल मराठी’ या रियालिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या शोमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून एकापेक्षा एक स्पर्धक आले होते. बरेच एपिसोड झाल्यानंतर आता शोचा फिनालय पार पडला आणि या पर्वात पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी शोमध्ये महाराष्ट्राला त्यांचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. यात जगदीश चव्हाण, प्रतीक सोळसे, सागर म्हात्रे, श्वेता दांडेकर आणि भाग्यश्री टिकले हे पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोचले आहेत. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली होती. स्पर्धकांमध्ये जिंकण्यासाठी एक झुंज लागली आहे आणि या रेसमध्ये सागर पहिला आला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘गाडीवान दादा’ असं टोपणनाव पडलेल्या सागरने हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुक मिळवले. आता ‘इंडियन आयडल मराठी’ च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली.

 

Leave a comment

Your email address will not be published.