अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. अंजीर हे एक अतिशय चविष्ट ड्राय फ्रूट आहे. त्याचा आकार गोल असून त्यात कुरकुरीत बिया असतात. अंजीर हे एक फळ आहे ज्यापासून ड्रायफ्रूट देखील बनवले जाते.

सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेल्या अंजीराचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात, कारण अंजीर हे पोषक तत्वांचे, खनिजांचे पॉवरहाऊस आहे. त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी अंजीर खाण्याचे फायदे, जे तुम्हाला क्वचितच माहीत असतील.

बद्धकोष्ठता दूर होते

अंजीराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते. अंजीरमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खा. असे केल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

साखरेची पातळी नियंत्रित ठेवते

अंजीरमध्ये भरपूर पोटॅशियम असते, जे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अंजीरमध्ये असलेले क्लोरोजेनिक ऍसिड रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे.

भिजवलेले अंजीर खाल्ल्याने टाईप-२ मधुमेहामध्येही रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते. सॅलड्स, स्मूदीज, कॉर्नफ्लेक्स बाऊल्स किंवा ओट्समध्ये अंजीर घालून तुम्ही हे सुकामेवा तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

खनिजे समृद्ध

अंजीरमध्ये मॅंगनीज, झिंक, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. हे प्रजनन आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या ड्रायफ्रूटमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. पीएमएसचा त्रास असलेल्या महिलांना अंजीर खाण्याचा सल्लाही दिला जातो.

वजन कमी करण्यास उपयुक्त

तांबे, मॅग्नेशियम असे अनेक पोषक तत्व अंजीरमध्ये आढळतात. त्यांच्या मदतीने तुमचे चयापचय व्यवस्थित राहते. अंजीर तुमच्या कॅलरीजचे प्रमाणही नियंत्रित करते. त्यामुळे भूक कमी लागते आणि वजनही कमी होते.

हाडे मजबूत ठेवा

कॅल्शियमचा चांगला डोस घेतल्याने तुमची हाडे निरोगी राहतात. आपले शरीर स्वतःहून कॅल्शियम तयार करत नाही, त्यामुळे आपल्याला सोया, दूध, हिरव्या पालेभाज्या, अंजीर यासारख्या बाह्य स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. अंजीराच्या सेवनाने आपली हाडे मजबूत होतात.

Leave a comment

Your email address will not be published.