ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्रियांकाने तिच्या करिअरमध्ये जे स्थान मिळवले आहे तिथपर्यंत कोणत्याच अभिनेत्रीला पोहचणे शक्य नाही.

आपल्या करिअर सोबत प्रियंकाने स्वतःच्या परिवारावरही लक्ष दिले आहे. यावर्षी प्रियांका आणि निक एका मुलीचे पालक झाले आहेत. या जोडप्याने जानेवारी महिन्यात सरोगसीच्या मदतीने पहिल्या मुलाला जन्म दिला.

ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुलीच्या जन्मानंतर प्रियांकाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्याचवेळी या चिमुरडीचे स्वागत केल्यानंतर तीन महिन्यांनी प्रियांकाने तिच्या मुलीचे नाव उघड केले आहे.

एका वृत्तानुसार, प्रियांकाच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ असे आहे. यासोबतच मालतीच्या जन्माची तारीख आणि वेळही समोर आली आहे. या प्रमाणपत्रात मालती मेरीचा जन्म 15 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता झाला होता. मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावरून ही माहिती मिळाली आहे.

प्रियांका चोप्राच्या आईचे पूर्ण नाव मधु मालती चोप्रा आहे. तर मालती म्हणजे सुगंध किंवा चंद्रप्रकाश असलेले फूल. सध्या तरी निक जोनास आणि प्रियांका यांच्या मुलीच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published.