मुंबई : मंगळवारी जगभरात ईदचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बॉलिवूडचा दबंग सलमान खानची (Salman khan) बहीण अर्पिता खान (Arpita khan) आणि मेव्हणा आयुष शर्मा (Ayush sharma) यांनी एक भव्य ईद पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. पार्टीत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतही (Kangana ranout) पोहोचली. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगना राणौतचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर चाहते तिच्यावर प्रचंड नाराज दिसत असून व्हिडिओवर कमेंट करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, “गिरगिटचे रंग बदलत आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “हे सेक्युलर धक्कादायक आहे.”
एका यूजरने तिच्या पार्टीत येण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की, “हिला आत कोणी येऊ दिले?” याशिवाय एका चाहत्याने लिहिले की, “हिंदू-मुस्लिम लोक ईद कधीपासून साजरी करू लागले.” कंगनाचा व्हिडीओ पाहून चात्यांच्या भरभरून कमेंट्स येत आहेत, तर चाहते तिच्या पार्टीत जाण्यावरही प्रश्न उपस्थित करत आहेत.
कंगना सध्या लॉक अप होस्ट करत आहे, त्यामुळे ती चर्चेत आहे. कंगनाचा हा शो अंतिम टप्प्यात आला आहे, लवकरच लॉक अपला पहिला विजेता मिळू शकतो. मुनव्वर फारूक, प्रिन्स नरुला, अंजली अरोरा हे या शोचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर शिवम शर्माने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.