मुंबई : मिथुन चक्रवर्तीचा एक फोटो पाहून त्याचे चाहते बेचैन झाले आहेत. या फोटोमध्ये अभिनेता हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. अनेक भाजप नेते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर करून मिथुन चक्रवर्ती यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, किडनी स्टोनमुळे त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भाजपचे माजी खासदार अनुपम हजरा यांनी मिथुन चक्रवर्ती यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेता हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे. या पोस्टमध्ये खासदाराने लिहिले, “मिथुन दा लवकर बरे व्हा”.
अनुपम हाजरा यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मिथुनदाचे चाहते त्यांना अशा अवस्थेत पाहून अस्वस्थ झाले आहेत. माजी खासदाराच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी अभिनेत्याला बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. ही पोस्ट 30 एप्रिलची आहे.
दरम्यान, एका प्रसिद्धवृत्तानुसार मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने रुग्णालयात दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचा दावा केला आहे. रिपोर्टनुसार, मिमोह चक्रवर्तीने सांगितले की, मिथुन दा यांना किडनी स्टोन ऑपरेशन साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण आता अभिनेत्याला बंगळुरूच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे.