आरसीबी आणि केकेआर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी विरोधी संघाच्या फलंदाजांवर शेवट पर्यंत दबाव आणून ठेवला होता. केकेआरचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि अवघ्या 128 धावांवर सर्वबाद झाला. त्याचवेळी मैदानावर एक गंमतीदार प्रसंग पाहायला मिळाला. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू घेतला.

या रिव्ह्यूला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू म्हटले जात आहे कारण चेंडू बॅटच्या मध्यभागी आदळला असतानाही आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने एलबीडब्ल्यूचा रिव्ह्यू घेतला. त्याचे झाले असे की वरुण चक्रवर्तीने हर्षल पटेलच्या चेंडूचा बचाव केला.

हर्षल पटेलचा चेंडू सरळ स्टंपवर गेला. गोलंदाज हर्षल पटेलने चेंडू प्रथम फलंदाजाच्या बुटाला लागल्याचे लक्षात घेऊन एलबीडब्ल्यूचे आवाहन केले. ज्यानंतर फाफ डू प्लेसिसने रिव्ह्यू घेण्याचा विचार केला आणि हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वाईट रिव्ह्यू ठरला कारण चेंडू बॅटच्या मध्यभागी आदळला होता.

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआर संघाने एकापाठोपाठ एक गडी गमावला आणि त्यांचा संपूर्ण लवकर संपला. केकेआरकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 25 धावा केल्या, तर आरसीबीकडून वनिंदू हसरंगाने 4 षटकात 20 धावा देत 4 बळी घेतले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *