कपडे घेताना पॅन्ट कोणती घ्यायची म्हण्टलं तर जोतो जीन्सलाच पसंती दाखवतो. ही एक सर्वांचीच चीच आवड बनली आहे. यात प्रत्येकाकडे एक तरी काळ्या रंगाची जीन्स असतेच. पण बऱ्याचदा असे होते की काही दिवसातच काळ्या जीन्सचा रंग फिका पडू लागतो.

यात जर ही जीन्स आवडीची असेल तर मग ती लवकर घालणे बंद करू वाटत नाही. पण खरंतर फिकी पडलेली जीन्स घातल्याने लुकही खराब होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही काही टिप्सच्या मदतीने ही जीन्स नवीनसारखे बनवू शकता. चला जाणून घेऊ जीन्सला नवीन रूप देणाऱ्या सोप्या पद्धतींबद्दल…

जीन्स रंगवा

जीन्सचा रंग फिका पडतो तेव्हा जीन्स रंगविणे हा उत्तम पर्याय आहे. यासाठी प्रथम जीन्स नीट धुवून वाळवा. ज्यामुळे जीन्समधील घाण निघून जाईल आणि डाई आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल.

रंगाचे सामान

जीन्स रंगविण्यासाठी बाजारातून लिक्विड किंवा पावडर डाई कलर खरेदी करा आणि त्यावर लिहिलेल्या सूचना नीट वाचा. डाईंग करताना धातूचे चमचे, हातमोजे, टब आणि वर्तमानपत्रही घ्या.

जीन्स कशी रंगवायची

जीन्स रंगवताना प्रथम वर्तमानपत्र जमिनीवर ठेवा. आता टबमधील पाण्यात रंग मिसळा आणि त्यात जीन्स भिजवा आणि मध्येच पाणी ढवळत राहा. डाई कलरवर लिहिलेल्या सूचनेनुसार, जीन्स डाईमध्ये भिजवा आणि ठराविक वेळेनंतर जीन्स काढून टाका आणि थंड पाण्याने धुवा. यानंतर तुम्ही जीन्स वॉशिंग मशिनमध्ये डिटर्जंटनेही धुवू शकता.

व्हिनेगर आणि मीठ वापरा

जीन्समधील डाईचा रंग सेट करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि मीठाची मदत घेऊ शकता. यासाठी जीन्स उलटा करा. आता 1 कप व्हाईट व्हिनेगरमध्ये 1 चमचे मीठ घाला. हे डाईचा रंग सुनिश्चित करेल आणि तुमची जीन्स लवकर फिकट होणार नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा

रंग दिल्यानंतर थेट जीन्स घालणे टाळा. अशा परिस्थितीत जीन्स घालण्यापूर्वी एकदा धुवा. तसेच, जीन्स स्वच्छ ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे लिक्विड डिटर्जंट वापरा. दुसरीकडे, जीन्स वॉशिंग मशीनमध्ये न धुता हाताने धुणे चांगले. याशिवाय जीन्स उन्हात अजिबात वाळवू नका. अन्यथा जीन्सचा रंग फिका होऊ शकतो.