डोक्यावरील केसांप्रमाणेच सौंदर्य वाढवण्यात चेहऱ्यावर असणाऱ्या भुवया देखील खूप महत्वाची भूमिका बाजवतात. पण यासाठी त्या काळ्याभोर आणि सुंदर असायला हव्यात. मात्र बरेच लोक भुवयांचे केस पांढरे होत असल्याची तक्रार करत असतात.

भुवयांच्या पांढऱ्या होणाऱ्या केसांनी अनेकजण चिंतीत असतात. काहीजण ज्यापद्धतीने डोक्यावरील पांढऱ्या केसांसाठी डायची मदत घेतात त्याचपद्धतीने ते भुवयाही काळ्या करण्याचा विचार करतात. पण हे डाय केमिकलयुक्त असते जे नुकसानही पोहचवू शकते.

असपरिस्थितीत काही नैसर्गिक गोष्टींचा अवलंब करून तुम्ही भुवयांच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळे करू शकतात, चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल…

कॉफी पावडर ने केस होतील काळे

कॉफी पावडर वापरून, तुम्ही सहज आणि नैसर्गिकरित्या भुवयांचे केस काळे करू शकता. यासाठी गरम पाण्यात कॉफी पावडर मिसळून पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट भुवयांवर लावल्यानंतर अर्ध्या तासानंतर ताज्या पाण्याने धुवा.

काजळही वापरता येईल

भुवया नैसर्गिकरित्या काळ्या करण्यासाठी तुम्ही घरगुती काजळ देखील वापरू शकता. यासाठी तुपाचा दिवा लावा आणि तुपात थोडा कापूर मिसळा, आता दिवा अर्धा भांड्यात झाकून ठेवा. ५-६ तासांनंतर भांड्यात बनवलेल्या काजळमध्ये खोबरेल तेल मिसळून भुवयांना लावा.

आवळ्याचा वापर करा

आवळा डोळ्यांच्या दृष्टीसाठी तसेच भुवयांसाठी फायदेशीर आहे. यासाठी आवळा पावडरमध्ये बदामाचे तेल मिसळून भुवयांना लावा आणि काही वेळाने भुवया धुवा. आपण दररोज ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.

नैसर्गिक मेहंदीने रंग येईल

भुवया काळ्या करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक मेंदी वापरावी. यासाठी मेंदीच्या पावडरमध्ये खोबरेल तेल मिसळून गरम करा. आता थंड झाल्यावर ही पेस्ट भुवयांवर लावा. यामुळे तुमच्या भुवया काळ्या होतील.