मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो, यावेळीही असेच काहीसे झाले आहे. अभिनेता सलमान त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सलमानला पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक विधान जारी केले आहे, ज्यामध्ये तिने सलमान खानला ‘महिला अत्याचारी’ म्हटले आहे.

तिने अभिनेत्यासोबत स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने असा दावा केला आहे की सलमान खान तिला मारहाण करायचा आणि सिगारेटने जाळायचा. सोमीने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे, जी तिने आता डिलीट केली आहे.

मात्र, पोस्ट काढण्यापूर्वीच त्याचे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाले आहेत. या पोस्टद्वारे सोमीने सलमान खानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही निशाणा साधला आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “आता खूप काही होणार आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि त्यानंतर वकिलांद्वारे मला धमक्या दिल्या…तू भित्रा आहेस…माझ्या संरक्षणासाठी 50 वकील उभे राहतील. जे मला सिगारेटने जाळण्यापासून आणि अत्याचार होण्यापासून वाचवतील, जे तू माझ्यासोबत वर्षानुवर्षे केलेस.”

सोमीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, ‘लज्जास्पद आहे त्या सर्व अभिनेत्रींना ज्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाचे समर्थन करत आहेत. अशा अभिनेत्यांनाही लाज वाटली पाहिजे, ज्यांनी याचे समर्थन केले. आता ही आर की पारची लढाई झाली आहे. सोमीची पोस्ट सोशल मीडियावर आगीसारखी व्हायरल होत आहे, ज्यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एकीकडे काही यूजर्स सोमीला सपोर्ट करत आहेत, तर दुसरीकडे सलमान खानचे चाहते त्याच्या समर्थनात उभे राहिले आहेत. सोमी अलीची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने सलमान खानचे नाव न घेता आरोप केला आहे की, तिच्या शोवर भारतात बंदी घातली आहे. यासोबतच तिला धमक्याही दिल्या जात आहेत.