मुंबई : काल IPL 2022 (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध, दिल्ली कॅपिटल्सचा (DC) सलामीवीर पृथ्वी शॉने अतिशय आक्रमक फलंदाजी करताना दिसला. शॉच्या आक्रमक खेळीनंतर भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने या युवा फलंदाजाचे कौतुक केले आहे.

पृथ्वी शॉने 34 चेंडूत 61 धावा केल्या पण त्याचा संघ चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकला नाही आणि 20 षटकांत तीन विकेट गमावून 149 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, क्विंटन डी कॉकच्या 80 धावांच्या खेळीच्या बळावर लखनऊने दोन चेंडू बाकी असताना चार गडी गमावून 155 धावा करून सामना जिंकला.

त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीची चर्चा करताना आकाश चोप्रा शॉबद्दल म्हणाला, “पृथ्वी शॉ अगदी पृथ्वी क्षेपणास्त्रासारखा होता. मी म्हणालो तो पृथ्वी शॉचा दिवस असू शकतो. किती अप्रतिम फलंदाजी कामगिरी आहे, जेव्हा तो अशी फलंदाजी करतो तेव्हा तुम्हाला वाटते की तो इतका स्फोटक सलामीवीर फलंदाज आहे ज्याची प्रत्येकाला गरज आहे.

तो पुढे म्हणाला की, लखनौ सुपर जायंट्सचा एकही गोलंदाज पृथ्वीला रोखू शकला नाही. “विरोधी गोलंदाजी चांगली होती, ती सर्वोत्तम गोलंदाजी लाइनअप नाही पण ती वाईटही नाही. सुरुवातीला कृष्णप्पा गौतमला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले, त्यानंतर आवेश खान आणि रवी बिश्नोई, केएल राहुलने सर्व प्रयत्न केले पण पृथ्वी शॉला कोणीही रोखू शकले नाही.

आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारणाऱ्या शॉने डेव्हिड वॉर्नरच्या साथीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत वॉर्नरचे योगदान अवघ्या 4 धावांचे होते.

माजी खेळाडू पुढे म्हणाला की, सरफराज खान आणि ऋषभ पंत यांच्यातील ७५ धावांच्या भागीदारीत सरफराजने चांगली फलंदाजी केली. तो म्हणाला, पॉवेलनंतर ऋषभ पंत आला. तोही शेवटपर्यंत तिथेच उभा राहिला. सरफराज आणि ऋषभ पंत यांनी नाबाद भागीदारी केली जिथे सरफराज बहुतेक वेळा चांगली फलंदाजी करत होता आणि त्यानंतर ऋषभ पंतने एका षटकात अँड्र्यू टायवर हल्ला केला आणि संघाला 149 पर्यंत नेले.

शेवटी आकाश चोप्रा म्हणाला की, “दिल्लीच्या फलंदाजांनी फारसे प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळेच केवळ तीन विकेट्स गमावूनही संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *