करनाल : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) वाढत्या किमतींमुळे देशावर मोठे संकट आले आहे. दोन देशाच्या युद्धामुळे त्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.

यावर आता, योगगुरू स्वामी रामदेव (Ramdev baba) यांनी लोकांना वाढत्या महागाईला सामोरे जाण्याचा सल्ला दिला असून, लोकांना त्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे, त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

करनाल (Karnal) येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान स्वामी रामदेव यांना गेल्या आठवडाभरात सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीबाबत विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, या महागाईला तोंड देण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

देश चालवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर कर वाढवला

रामदेव बाबा यांनी भाजपची (Bjp) बाजू घेत सरकार आणि देश चालवायला हवा, असे म्हणाले आहेत. त्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ करण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत.

लोक अधिक कष्ट करतात आणि अधिक कमावतात

 

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर योगगुरू रामदेव म्हणाले, ‘आता त्यांना सरकार चालवण्यासाठी कर घ्यावा लागेल. महागाई असेल तर काही उत्पन्न वाढवावे लागेल.

तसेच अधिक मेहनत करावी लागेल. मी संन्यासी असल्याने १८-१८ तास काम करतो. इतर लोकही काम करतील तर कमावतील आणि महागाईही सहन करतील. देशाची प्रगती होईल, असे बाबा रामदेव यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले आहे.

योगाबद्दल काय म्हणाले रामदेव बाबा

योगाबद्दल रामदेव म्हणाले की, आपले संपूर्ण जीवन योग आणि योगासाठी आहे. योगधर्म हा या काळातील युगधर्म आहे. त्याचबरोबर खरा मानवधर्म, राष्ट्रधर्म, सेवाधर्म, हाच परम धर्म आहे.

या धर्मात सामील व्हा. कर्नालमध्ये याआधीही योगासाठी शेकडो वर्ग भरवले जायचे, जे कोरोनानंतर पुन्हा सुरू झाले आहेत. तसेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, योगाऐवजी उत्तम काम करणाऱ्या मनोहर लाल यांच्यावर चित्रपट बनवायला हवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *