उन्हाळ्यात शारीरिक स्वाथ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी, शरीराला थंड व ताजेतवाने ठेवण्यासाठी आहारात दही खाणे खुप फायद्याचे ठरते. याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे याचे प्रमाण दह्यामध्ये असते,त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. यासोबतच दह्याचे आणखी काही फायदे आहेत, ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात दही खाण्याचे विविध फायदे

१. दही योनिमार्गाच्या संसर्गास प्रतिबंध करते

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दही खाल्ल्याने महिलांच्या योनीतील यीस्टचे संतुलन पुनर्संचयित करण्यात मदत होते, कारण दह्यात लैक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात, जे योनीमार्गातील संक्रमण रोखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला योनीमार्गाच्या संसर्गाचा त्रास असेल तर रोज आहारात दही खा तुम्हाला आराम मिळेल.

२. शरीराचे वजन कमी करण्यासाठी दही उपयुक्त ठरते

शरीराचे वजन कमी करण्यासाठी दही उपयुक्त आहे. कारण ते आपल्या शरीरात कोर्टिसोल आणि स्टेरॉइड हार्मोन्सची वाढ रोखते, ज्यामुळे लठ्ठपणाचा वाढता धोका कमी करते.

३. दात आणि हाडे मजबूत होतात

दह्यामध्ये कॅल्शियम तर भरपूर असतेच, पण त्यात फॉस्फरसही भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हे दोन्ही पोषक घटक आपल्या हाडांसाठी तसेच दातांसाठी खूप फायदेशीर असतात. एवढेच नाही तर सांधेदुखीपासून बचाव करण्यासही दही मदत करते.

४. हृदयासाठीही आरोग्यदायी आहे

दही कोलेस्ट्रॉल तयार होण्यास प्रतिबंध करते आणि यामुळेच तुम्ही उच्च रक्तदाब – रक्तदाब सारख्या परिस्थितीपासून दूर राहता. उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आणि उच्च रक्तदाबाचा धोका आहारात नियमितपणे समाविष्ट करून कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Leave a comment

Your email address will not be published.