दिवसेंदिवस वाढणारा उष्मा आणि कडक उन्हामुळे आरोग्य तर बिघडतेच शिवाय त्वचेचेही खूप नुकसान होते. जर तुम्ही या उन्हाळ्यात बाहेर गेलात तर तुम्हाला तुमच्या त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागेल. कडक उन्हात त्वचा टॅनिंग होऊ लागते. चेहऱ्यावर उष्णतेमुळे घाम येतो, ज्यामुळे पिंपल्सची समस्या देखील होऊ शकते.
उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही उन्हाळ्यातील खास पदार्थांचा समावेश करू शकता. उन्हाळ्यात, त्वचेचा कोरडेपणा आणि निस्तेजपणा टाळण्यासाठी बहुतेक लोक बाजारात उपलब्ध लोशन आणि क्रीम वापरतात.
परंतु या गोष्टी केवळ बाहेरूनच त्वचेचे संरक्षण करू शकतात. उन्हाळ्यात त्वचेला आतून निरोगी ठेवण्यासाठी काही खास गोष्टींचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात कोरडी त्वचा टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
कोरडी त्वचा टाळण्यासाठी या गोष्टी खा
१.टरबूज
उन्हाळ्यात आढळणारे हंगामी फळ आहे. टरबूजात पाणी मुबलक प्रमाणात असते. अशा वेळी उन्हाळ्यात टरबूजाचे सेवन केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि आरोग्यासोबतच त्वचाही निरोगी राहते. टरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होत नाही. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
२.काकडी
उन्हाळ्यात काकडी आवर्जून खाल्ली जाते. सलादमध्ये काकडी खाणे बहुतेक लोकांना आवडते. त्याचबरोबर काकडीचा रायता आणि काकडीचा रसही प्यायला जातो. काकडीत 95 टक्के पाणी असते. काकडीत आढळणारे पोषक तत्व त्वचा निरोगी ठेवण्यास आणि कोरडेपणापासून संरक्षण करण्यास मदत करतात. काकडी शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.
३.नारळ पाणी
उन्हाळ्यात नारळ पाणी जरूर प्या. उन्हाळ्यात नारळाच्या पाण्यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात आणि शरीर थंड राहण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामुळे त्वचा आणि केसही निरोगी राहतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे पोषक घटक शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतात आणि त्वचा चमकदार बनवतात.
४.दही
उन्हाळ्यात त्वचेला कोरडेपणा आणि निस्तेजपणापासून वाचवण्यासाठी दह्याचे सेवन जरूर करा. दही केवळ पोटासाठीच नाही तर केस आणि त्वचाही निरोगी ठेवते. उन्हाळ्यात दही खाल्ल्याने त्वचेत कोरडेपणा येत नाही आणि शरीरही थंड राहते.