माणसाच्या प्रत्येक चांगल्या-वाईट सवयीचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. वेळेवर झोप आणि चांगला आहार घेतल्याने आपण केवळ तंदुरुस्त राहत नाही तर मानसिकदृष्ट्याही मजबूत असतो.

डॉक्टर सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी काही खास गोष्टी खाल्ल्या तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. या गोष्टी खाल्ल्यानंतर आपल्याला चांगली झोप लागते आणि दिवसभराच्या थकव्यानंतर शरीरालाही आराम मिळतो. परिणामी आपण दिवसाची सुरुवात नव्या ऊर्जेने करतो. आज तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगत आहोत.

एक ग्लास दूध

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, रात्री झोपण्यापूर्वी रोज एक ग्लास दूध प्यायला हवे. प्रथिने, कॅल्शियम आणि आयोडीनसह अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे दुधामध्ये आढळतात, ज्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. थंडीच्या दिवसात एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने आपल्या स्नायूंना आणि शरीराला खूप आराम मिळतो. हवं असल्यास त्यात थोडी हळदही घालू शकता. दुधासोबत हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म आरोग्यास लाभ देतात.

बदाम

रात्री काही बदाम खाल्ल्यानंतरही झोप येते. हेल्दी फॅट्स, एमिनो अॅसिड आणि मॅग्नेशियम बदामामध्ये आढळतात, जे खाल्ल्याने तुम्हाला पुरेशी आणि शांत झोप घेता येईल. बदामामध्ये असलेले अमीनो अॅसिड आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप चांगले मानले जाते. जेव्हा आपले शरीर स्लीप मोडवर असते, तेव्हा अमीनो ऍसिड त्वचा आणि केसांसाठी चांगले काम करण्यास सक्षम असतात.

केळी

तुम्ही बहुतेक लोकांना नाश्त्यामध्ये केळी खाताना पाहिलं असेल, पण तुम्हाला माहित आहे का की झोपण्यापूर्वी केळी खाल्ल्याने आपल्या शरीरालाही फायदा होतो. केळीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, जे ट्रिप्टोफॅन बनवण्यास मदत करतात. हे मनासाठी खूप चांगले मानले जाते. याचे सेवन केल्यावर आपल्याला चांगली झोप लागते. याशिवाय, केळांमध्ये मॅग्नेशियम देखील चांगले असते, जे स्नायू आणि मज्जातंतूंना आराम देण्याचे काम करते. यामध्ये असलेले फायबर देखील शरीरासाठी उत्कृष्ट मानले जाते.