आपल्याला माहीतच आहे की देशातील कोणत्याही भागात रस्त्यावर वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हे आवश्यक असते. कारण हा शासनाने काढलेला एक वाहन कायदा आहे. जर परवाना नसल्यास रस्त्याने वाहन चालवता येत नाही.

परंतु देशात उपलब्ध असलेली काही वाहने चालवण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्सची सक्ती नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ही वाहने.

ज्या वाहनांसाठी DL आवश्यक नाही

250 वॅट पेक्षा कमी आणि कमाल वेग 25 किमी/ता पेक्षा जास्त नसलेली इलेक्ट्रिक मोटर असलेल्या स्कूटरना चालवण्यासाठी कोणत्याही ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नसते. चला तर मग जाणून घेऊया भारतात अशा कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत.

ओकिनावा R30

या स्कूटरला सामान्य चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. ही स्कूटर एका चार्जमध्ये 60 किमी पर्यंत धावू शकते.

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश LX

हिरोची ही इलेक्ट्रिक स्कूटर 85 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. या स्कूटरला चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.

अँपिअर रिओ प्लस

ही स्कूटर चार्ज होण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. एका चार्जवर ही स्कूटर 65 किमी पर्यंत धावू शकते.

16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 2030 पर्यंत संपूर्ण इलेक्ट्रिक देश बनवण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ई-स्कूटर चालविण्याची परवानगी आहे. पहिल्यांदाच दुचाकी चालवण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन लायसन्स प्लेट्स लागू केल्यानंतर हा नियम लागू करण्यात आला आहे.