आपल्या आरोग्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. यामुळेच आरोग्यसाठी दररोज ३-४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पण, अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. तज्ज्ञांचे असे मत आहे की, जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

आरोग्य तज्ञांच्या म्हणन्यानुसार खाल्लेले अन्न पचायला जवळपास २ तास लागतात. यादरम्यान पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जेवल्यावर किमान ४५ ते ५० मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. तसेच, जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायला हवे.

जेवताना पाणी पिणे टाळावे, जेवणासोबत किंवा लगेच पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. काही लोक जेवणानंतर लगेच पाणी पितात त्यामुळे त्यांना अॅसिडिटी, ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात.

अन्न खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की अन्न पचण्यास सुमारे 2 तास लागतात, दरम्यान पाणी पिल्याने पचनावर परिणाम होतो. म्हणूनच अन्न खाल्ल्यानंतर ४५-६० मिनिटांनी पाणी प्यावे. हे देखील लक्षात ठेवा की जेवण करण्यापूर्वी अर्धा तास पाणी प्या.

योग्य वेळी पाणी पिण्याचे फायदे:

अन्न खाल्ल्यानंतर तासाभराने पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.योग्य वेळी पाणी प्यायल्याने पचनक्रिया बरोबर राहते, पचनक्रिया मजबूत राहते.

पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या नाही. शरीर अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते. योग्य वेळी पाणी प्यायल्यानेही चांगली झोप येण्यास मदत होते.

अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे तोटे:

-लठ्ठपणा समस्या

-पचन समस्या

-उच्च रक्तातील साखरेची समस्या

-पोटात गॅसची समस्या

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *