सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहे. अशा तीव्र उन्हात सतत तहान लागत असते. त्यावेळी थंड पाणी पिण्याची इच्छा जागृत होते. मग अनेकजण फ्रिजमधील पाणी पितात, पण याने आपली तहान भागत नाही. व हे पाणी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मात्र याऐवजी माठातील पाणी आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे मानले जाते.
तर जाणून घेऊयात माठातील पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेमंद ठरू शकते.
उष्णतेपासून संरक्षण करते
माठाचे पाणी नैसर्गिकरित्या थंड असून ते पिण्यास छान लागते. घागरीचे पाणी रेफ्रिजरेटरच्या पाण्यापेक्षा जास्त प्रमाणात पिऊ शकतो. अशा परिस्थितीत ते तुमच्या शरीराला थंड ठेवते, पाण्याची कमतरता भरून काढते आणि उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते. माठाच्या पाण्यासोबत शरीराला अनेक खनिजेही मिळतात.
घशाची समस्या टाळते
उन्हाळ्यात फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा खराब होतो, पण माठाचे पाणी प्यायल्याने घश्याचा कोणताच होत नाही. माठाचे पाणी तुमचे शरीर थंड करते आणि वाढलेले शरीरातील तापमान नियंत्रित करते. पण उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे.
गॅस व अॅसिडिटीपासून आराम
उन्हाळ्यात गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास खूप वाढतो. माठाचे पाणी तुम्हाला अशा संकटांपासून मुक्ती देते. उन्हाळ्यात रोज घागरीचे पाणी प्यायल्यास पोटाच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
त्वचेसाठी चांगले
उन्हाळ्यात त्वचा चिकट होते. अशा स्थितीत फोड, मुरुम आणि पुरळ यांसारख्या समस्या उद्भवतात. घागरीतील पाणी प्यायल्याने तुमच्या समस्या नियंत्रणात राहून तुमची त्वचा उजळते.