घरात बिर्याणी बनत असेल किंवा जिरा राईस त्यात वापरल्या जाणाऱ्या तमाल पत्राच्या वासानेच ते लगेच ओळखले जाते. स्वयंपाक घरात पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे हे तमालपत्र आरोग्यासाठीही एक औषध म्हणून काम करते.

तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन-सी, ए, बी, ई, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, तांबे आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी फायद्याचे मानले जातात. तुम्ही याचा चहामध्येही रोज वापर करू शकता.

तमालपत्रापासून बनवलेल्या चहाचे सेवन तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यात मदत करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया तमालपत्र चहा पिल्याने होणाऱ्या आरोग्य फायद्यांबद्दल…

झटपट वजन कमी होते

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तमालपत्रापासून तयार केलेला चहा घेऊ शकता. हे तुमच्या शरीरातील चयापचय पातळी वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी

तमालपत्रात पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात, ते तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदयाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळेल.

मधुमेहींसाठी खूप फायद्याचा

या चहाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार, तमालपत्रापासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारते. याशिवाय या चहाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे तुमचा मधुमेहही नियंत्रणात राहतो.

संसर्ग टाळण्यास मदत करते

तमालपत्रामध्ये आढळणारे अँटीफंगल गुणधर्म शरीराला कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. यामध्ये Candida albicans नावाचा घटक आढळतो, जो कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतो. विशेषत: बुरशीजन्य संसर्गामध्ये, आपण तमालपत्र तेल वापरू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून आराम मिळेल.

तमालपत्र चहा कसा बनवाल?

चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तमालपत्र – 3-4
दालचिनी पावडर – एक चिमूटभर
पाणी – 2 कप
मध – १/२ चमचे
लिंबू – अर्धा तुकडा

कृती

-प्रथम तमालपत्र पाण्याने धुवा आणि भांड्यामध्ये 2 कप पाणी गरम करा.
-यानंतर, तमालपत्र पाण्यात उकळण्यासाठी ठेवा.
-1 मिनिट उकळवा आणि नंतर दालचिनी पावडर घाला.
-मिश्रण 3-4 मिनिटे उकळू द्या. ठराविक वेळेनंतर त्यात मध टाका.
-तुमचा तमालपत्र चहा तयार आहे. तुम्ही चाळणीने गाळून घ्या.
-नंतर त्यात चवीनुसार लिंबू घालून याचे सेवन करू शकता.