नवी दिल्ली : अॅडलेडच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाचा इंग्लिश संघाने 10 गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांचा राग चांगलाच उफाळून आला. या पराभवाचे मुख्य कारण रोहित शर्माचे कर्णधार असल्याचे चाहत्यांचे मत आहे. या परभवानंतर चाहत्यांनी रोहितला जोरदार ट्रोल केले.

ट्विटरवर एका यूजरने रोहित शर्माचा एडिट केलेला फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तो हातात वडापाव धरलेला दिसत आहे. यासोबत युजरने लिहिले की, ‘खूप चांगली कॅप्टनसी वडापाव’ आणखी एका यूजरने रोहितचा एडिट केलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोत लिहिले होते, ‘रोहित काळजी करू नकोस, आमच्याकडे 5 आयपीएल ट्रॉफी आहेत.’ असे अनेक यूजर्स आहेत ज्यांनी विराट कोहलीचा फोटो देखील शेअर केला आणि लिहिले की, ‘विराट कर्णधार नाही हे चांगले आहे.’ तर काही यूजर्स असे म्हणत आहेत, ‘माजी कर्णधार धोनीसारखा कोणी नाही.’

हिटमॅनसाठी ही स्पर्धा खूपच वाईट ठरली, संपूर्ण टूर्नामेंटमध्ये रोहित फ्लॉप दिसला. त्याने सहा सामन्यांमध्ये एकूण 116 धावा केल्या ज्यात त्याची सरासरी 19.33 आहे. मोठे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितचा स्ट्राईक रेट फक्त 106.42 होता.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर विराट कोहली (50) आणि हार्दिक पांड्या (63) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर संघाने 168 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 20 षटकांत 169 धावा करायच्या होत्या, ज्या त्यांनी जोस बटलर (80) आणि अॅलेक्स हेल्स (86) यांच्या खेळीच्या जोरावर अवघ्या 16 षटकांत सहज गाठल्या.