आमदार रोहित पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार भाजपा सरचिटणीस सचिन सखाराम पोटरे व अल्लाउद्दीन काझी

यांनी केल्यामुळेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व माजी मंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.

माजी मंत्री श्री.राम शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री.अरुण मुंडे , ,संघटन सरचिटणीस श्री.दिलीप भालसिंग , अल्लाउद्दीन काझी ,शेखर खरमरे , पप्पू शेट धोदाड , सुनील काळे ,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री.शोयब काझी , गणेश पालवे,यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अधीक्षक श्री मनोज पाटील यांची बुधवारी भेट घेवून याबाबत निवेदन दिले आहे.

जिवे मारण्याची धमकी देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल व्हावा, १५ दिवसांच्या आत तडीपारीचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. भाजपाचे काम करत असताना विरोधक या नात्याने सातत्याने आमदार रोहित पवार यांच्या चुकीच्या धोरणांवर व राजकीय भूमिकांवर, तसेच माजी मंत्री शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या व सद्यस्थितीत अपूर्ण असलेल्या विकासकामांबद्दल पक्षाच्या वतीने मिडीया, सोशल मिडीया व विविध वृत्तपत्रात भाजपाची भूमिका मांडत असतो.

यामुळे धांडेवाडी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे हे गुंड प्रवृत्तीच्या व अतिगंभीर गुन्हे दाखल असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे घालून सातत्याने मोबाईलवर व प्रत्यक्षात समोर आल्यावर देखील ‘तू आमदार रोहीत पवार यांच्या विरोधात बोलत जावू नकोस,

हे खूप मोठ घराणं आहे, तुला कधी गायब करतील हे कोणालाच कळणार नाही आणि आता यापुढे जर तू त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या घराण्याबद्दल विरोधात बोललास, तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू तसेच आम्ही आमच्या साथीदारांकरवी जिवे मारुन टाकू’ असे धमकावले असल्याचे पोटरे यांनी म्हटले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *