महाअपडेट टीम, 3 मार्च 2022 :सुजाता पवार : रुग्णालयाची बाह्यरुग्ण सेवा पूर्ववत न्हावरे (ता . शिरूर ) येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या काळात अहोरात्र हजारों रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचे प्राण वाचविले त्यांचे हे कार्य जनतेच्या हृदयस्थानी असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी काढले .न्हावरे (ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून कोविड सेंटर सुरू होते. त्यामुळे येथील बाह्यरुग्ण तपासणी सेवा बंद होती. आता ती पूर्ववत सुरु करण्यात आली .
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या याप्रसंगी न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा ग्रामस्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिरुर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हारगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर राजेनिंबाळकर, सरपंच अलका शेंडगे माजी उपसरपंच अरुण तांबे ,डॉ. दिनकर सरोदे,डॉ.लता पांढरे डॉ. वैशाली पवार ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब कोकरे तात्या शेंडगे, संदीप यादव, उत्तम कदम सुभाष कोकडे, गोरख तांबे,अमोल गावडे,आबासाहेब नवले आदी उपस्थित होते .
तसेच सुजाता पवार म्हणाल्या की, वैद्यकीय अधीक्षक लता पांढरे, न्हावरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर सरोदे, डॉ. सुप्रिया गावडे,डॉ. लीना पाटील,डॉ. बाळासाहेब कदा यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाकाळात रुग्णांवर उपचा केले. त्यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचले त्यांच्या या कार्याची नेहमीच दखत घेण्यात येणार असून, लोकप्रतिनिध नेहमीच त्यांच्या पाठीशी राहतील,
शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील जनतेल लागणाऱ्या आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेता न्हावरे ग्रामीण रुग्णालयार उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवू देण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे सुजाता पवार यांनी सांगितले .