पालकांच्या लाखो प्रयत्नांनंतरही मुले काही वाईट सवयींना सहज बळी पडतात. त्यामुळे पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे नेहमी पालक मुलांबरोबर वाद घालत असतात.

अनेक पालक मुलांना टोमणे मारणे किंवा मारण्याची भित देत असतात. पण असे केल्याने मुले जास्त वाद घालू लागतात. अशा परिस्थितीत पालक अडकतात. त्यामुळे आज तुम्‍हाला लहान मुलांशी वागण्‍याच्‍या काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्‍याने तुम्‍ही त्‍यांची वादावादी करण्‍याच्‍या वाईट सवयीपासून मुक्त होऊ शकता.

खूप कठोर होऊ नका

जर तुमच्या मुलाला वाद घालण्याची सवय असेल तर त्याच्याशी कठोरपणे वागू नका. अशा वेळी तुमच्या टोमणे किंवा मारण्यामुळे मुले हट्टी होऊ लागतात. यासोबतच जास्त फटकारल्यामुळे हळूहळू मुलांच्या मनातील पालकांची भीतीही संपुष्टात येते.

प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा

मुलांच्या वाईट सवयींना फटकारण्यापेक्षा त्यांना जवळ बसवून प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्यांचा हट्ट मिळवण्यासाठी मुलं मोठ्यांशी वाद घालू लागतात. अशा परिस्थितीत त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही प्रेमाने समजावून सांगितल्यास मुलं तुमचे नक्कीच ऐकतील.

मुलांना बोलण्याची संधी द्या

अनेक वेळा मुलांना वाद घालताना पाहून बहुतेक पालक मुलांना खडसावून गप्प करतात. मात्र, तुमच्या या वागण्याचा मुलांवर वाईट परिणाम होतो आणि मुले चिडायला लागतात. त्यामुळे मुलांना गप्प बसवण्याऐवजी त्यांचे बोलणे ऐकूनच प्रतिक्रिया देणे चांगले.

योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगा

मुलांच्या वादविवादासारख्या वाईट सवयीपासून मुक्त होण्यासाठी, त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगा. त्यानंतर त्यांना वादाच्या दुष्परिणामांची जाणीव करून द्या आणि त्यांना सांगा की वाद घालणे ही वाईट सवय आहे.