इंधनाचे वाढते दर पाहता आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मध्ये वाढ होत आहे. मात्र तत्पूर्वी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक बाइकने अचानक पेट घेतल्याच्या काही घटना घडल्या आहेत.
त्यामुळे विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर प्रश्न असा आहे कि नेमकं इलेक्ट्रिक वाहने का पेट घेतात याबाबत आपण जाणून घेऊ
लिथियम-आयन बॅटरी म्हणजे काय?
विजेवर चालणारी वाहने लिथियम-आयन बॅटरीवर चालतात.
या बॅटऱ्यांमध्ये ॲनोड, कॅथोड, सेपरेटर, इलेक्ट्रोलाइट आणि दोन करंट कलेक्टर्स इत्यादी असते.
ॲनोड आणि कॅथोडमध्ये लिथियम असते. लिथियम आयन्स ॲनोडमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन्स निर्माण करतात त्यातून बॅटरी चार्ज होते.
या बॅटऱ्या वजनाने हलक्या तर असतातच शिवाय त्यांचे आयुर्मानही मोठे असते.
त्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने लिथियम-आयन बॅटऱ्यांचाच वापर केला जातो.
गाड्यांना आग लागण्याचे कारण…
लिथियम-आयन बॅटऱ्या ज्वलनशील असतात.
विजेवर चालणाऱ्या गाड्यांना आग लागण्याची अनेक कारणे असू शकतात.
उत्पादनातील दोष, बाह्यभागाला तडा जाणे, किंवा बॅटरी मॅनेजमेेंट सिस्टीम वाहनात योग्य प्रकारे बसवली न गेल्यास आगी लागण्याच्या घटना घडतात.
तापमानातील चढ-उतार हेही आगीचे एक कारण सांगितले जाते.
उष्ण तापमानात बॅटऱ्यांचे तापमान ९० ते १०० अंश सेल्सिअसपर्यंत वाढून त्या पेट घेऊ शकतात.