वाढत्या रस्ते अपघातामुळे व लोकांनी रस्त्यावर व्यवस्थित गाडी चालवावी यासाठी सरकारने वाहतुकीचे नियम खूप कठोर केले आहेत. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून सरकारने डिजिटल चलन पद्धती सुरु केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात दंड वाढवण्यात आले आहेत. काहीवेळा नकळत तुमच्याकडूनही काही चुका होतात यामुळे तुम्हालाही मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागतो. यासाठी काही चुका टाळणे गरजेचे आहे.

वाहतुकीच्या नियमांमधील असे काही नियम आहेत जे आपल्याला माहित नसतात. ज्यामुळे तुम्हाला ट्रॅफिक चलन भरावे लागते. यासाठी आज आम्ही तुम्हाला ट्रॅफिक नियमांमध्ये होणाऱ्या तुमच्या काही सामान्य चुका सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही मोठा दंड भरण्यापासून वाचू शकता. यासाठी योग्य पद्धतीने ट्रॅफिक नियमांचे पालन करा.

जास्त वेगात जाऊ नका

जेव्हा तुम्हाला घरातून बाहेर पडावे लागेल तेव्हा लक्षात ठेवा की ओव्हर स्पीड गाडी चालवू नका कारण हे रोखण्यासाठी रस्त्यावर अनेक स्पीड टेस्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून वेगाने जाणारी वाहने ओळखता येतील. हलक्या मोटार वाहनासाठी ओव्हर स्पीडिंग केल्यास १००० ते २००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

चुकीच्या लेनवर गाडी चालवू नका

चुकीच्या दिशेने गाडी चालवणे किंवा चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अशा स्थितीत वाहतुकीची कोंडी तर होतेच, पण ते रस्ते अपघाताचे कारणही ठरू शकते. चुकीच्या दिशेने गाडी चालवू नका, अन्यथा पकडले गेल्यास तुम्हाला तीन महिने तुरुंगवास किंवा ५०० ते १००० रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

दारू पिऊन गाडी चालवू नका

दारू पिऊन वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण आहे. अल्कोहोलच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यामुळे तुम्हाला स्वतःला तसेच इतर जाणाऱ्यांना धोका असतो. भारतात, दारू पिऊन गाडी चालवल्यास १०,००० रुपयांचा मोठा दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

आपत्कालीन वाहनांचा मार्ग अडवू नका

रस्त्यावरून प्रवास करताना, आपत्कालीन वाहनांना रस्ता देण्याची काळजी घ्या. जर तुम्ही मार्ग देण्यास नकार दिला तर तुम्हाला १०,००० रुपये दंड किंवा ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो. रुग्णवाहिका, अग्निशमन ट्रक, पोलिस कार आणि तत्सम वाहने यासारख्या आपत्कालीन वाहनांचा समावेश आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *