मधुमेह हा आजार सध्याच्या काळात अतिशय सामान्य आजार बनला आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हजर दिसून येतो. आपल्या भारत देशामध्ये मधुमेहींची संख्या जास्त आहे.रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने हा आजार होतो.

मात्र, हा आजार तुम्हाला झाला आहे कि नाही व तो कसा ओळखायचा यासंबंधीची काही प्राथमिक लक्षणे आहेत ती तुम्ही जाणून घ्या.

या दरम्यान, तुम्हाला खूप तहान लागणे, थकवा येणे, वारंवार शौचास जाणे, अचानक वजन कमी होणे, जास्त भूक लागणे, पाय किंवा हाताला मुंग्या येणे असे वाटू शकते. मधुमेह होण्यापूर्वी ही लक्षणे जाणवतात.

प्री-मधुमेहावर औषधाविना उपचार करू शकता

तुम्हाला मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तुम्ही ताबडतोब तपासणी करून घ्यावी. कारण तुम्हाला प्री-मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी रोखण्यासाठी तुम्हाला औषधांची गरज भासणार नाही. अशा स्थितीत मधुमेहाची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तपासणी करून घ्या, जेणेकरून वेळीच नियंत्रण करता येईल.

तुम्हाला प्री-डायबिटीज असेल तर या चुका कधीही करू नका

-साखर खाऊ नका. आपल्या आहारातून साखरेपासून बनवलेल्या गोष्टी काढून टाका. त्याऐवजी तुम्ही फळे, गूळ किंवा मध यापासून नैसर्गिक साखर घेऊ शकता.

-जर तुम्हाला प्री-मधुमेहाची लक्षणे दिसली तर तुम्ही योगासने करू शकता. कारण स्वादुपिंडाच्या चांगल्या कार्यासाठी योगासने हा एक चांगला पर्याय आहे.

-चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. प्रत्येकाला माहित आहे की प्री-मधुमेह असणा-या लोकांनी 7-8 तासांची चांगली झोप घेतली पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच, चांगली झोप शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करते आणि हार्मोन्स देखील योग्य ठेवते.

-योग्य वेळी खाणे-पिणे हे तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही प्री-मधुमेहाचे रुग्ण असाल तर जेवणातील अंतरावर विशेष लक्ष द्यावे लागेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *