प्रत्येक आई-वडिल आपल्या लहान मुलाची योग्य ती काळजी घेत असतात. पण त्यासोबतच आरोग्यापासून ते त्याच्या सुरक्षेबाबतही योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. कारण तुम्हाला माहित आहे का की घरातील काही वस्तू व उत्पादने ही बाळासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून जर तुमच्याही घरात लहान बाळ असेल तर तुम्हीही अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
जाणून घेऊ जर बाळाला सुरक्षित ठेवायचे असेल तर, अशा कोणत्या गोष्टी अथवा वस्तू आहेत ज्या बाळासाठी काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत. याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
घरात असलेल्या डासांना मारण्यासाठी रसायने असलेल्या फवारण्यांचा मुलांच्या मेंदूवर, रोगप्रतिकारक शक्तीवर आणि शिकण्याच्या क्रियाकलापांवर वाईट परिणाम होतो. इतकंच नाही तर अस्वस्थता आणि चिडचिडही मुलाला त्रास देते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत.
प्लास्टिक कंटेनर
असे बॉक्स स्वस्त असतात आणि त्यामुळे लोक ते सहज खरेदी करतात. प्लॅस्टिकच्या कंटेनरचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. अशा डब्यात अन्न ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. बाळाची दुधाची बाटलीही प्लॅस्टिकची असते, त्यात गरम दूध ओतण्याचा विपरित परिणाम मुलाच्या शरीरावर दिसून येतो. त्याऐवजी तुम्ही काच किंवा स्टेनलेस स्टील वापरू शकता.
बाळ उत्पादने
बाळाच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी वापरलेली उत्पादने खरेदी करताना किंवा वापरताना विशेष काळजी घ्या. फॉर्मल्डिहाइड सारखी रसायने असलेली उत्पादने घेऊ नका. यामुळे बालकांना त्रास सहन करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, अशा उत्पादनांचा वापर केल्यास मुलांच्या त्वचेवर पुरळ उठू शकते. किंवा लहान वयात त्याच्या केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो.
डास मारण्याचे यंत्र
अनेक घरांमध्ये, लोकांना डासांचा इतका त्रास होतो की ते कीटकनाशक फवारण्या तसेच रेडिएशन मशीन लावतात. या मशिन्सच्या मदतीने तुम्ही डासांची समस्या दूर करू शकता, परंतु त्यांचा तुमच्यावर आणि तुमच्या बाळावर वाईट परिणाम होईल. तसेच मच्छरनाशक फवारणी टाळावी.