बऱ्याचदा लोक दिवसा आळस व सुस्ती येत असल्याची तक्रार करताना दिसतात. तसेच धावपळीच्या युगामध्ये चुकीच्या जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे अनेकजण आळस व थकवा येत असल्याचेही सांगत असतात. अशावेळी कोणतेही काम करावेसे वाटत नाही.
जर तुम्हालाही दिवसभर झोप लागणे, आळस येणे थकवा येणे यांसारख्या समस्या असतील. तर यातून ताजेतवाने राहण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा जेणेकरून तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल हे जाणून घ्या.
दही खा
दह्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स असतात जे थकवा आणि आळस दूर करण्यास मदत करतात. अशा स्थितीत काळी मिरी दह्यात मिसळून खा. यामुळे सुस्तीही दूर होईल आणि पचनक्रियाही बरोबर होईल.
ग्रीन टी प्या
दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स सुस्ती दूर करतात आणि मानसिक थकवाही दूर करतात. अशा परिस्थितीत तुम्हीही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टी पिऊन करा.
बडीशेप
बडीशेप, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम समृद्ध आहे, सुस्ती आणि थकवा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहात टाकून पिऊ शकता.
लिंबूपाणी
दररोज किमान १-२ ग्लास लिंबू पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहील. त्याच वेळी, १ लिंबापासून शरीराला ४०% व्हिटॅमिन सी मिळते. तसेच सुस्ती आणि थकवा दूर ठेवतो.
चॉकलेट
जर तुम्हाला सुस्त आणि थकवा वाटत असेल तर थोडे चॉकलेट खा. हे अँटिऑक्सिडंट्सचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे सुस्ती दूर करते आणि मूड सुधारते.
ओट्स
ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला तासंतास भूक लागत नाही. यासोबतच शरीराला एनर्जी मिळत राहते. अशा परिस्थितीत, सुस्ती आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही ओट्स देखील खाऊ शकता.