चेहऱ्यावरील सुंदर ओठ हे एकप्रकारे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम करत असतात. यामुळे प्रत्येकालाच वाटत असते की आपले ओठ आकर्षक व चमकदार असावेत. यासाठी अनेकजण रसायनयुक्त कॉस्मेटिक उत्पादने वापरतात. पण याचा उलट परिणाम होऊन ओठ काळे पडतात.

बऱ्याचदा नियमित धूम्रपान, सूर्यप्रकाशाचा जास्त संपर्क किंवा इतर अनेक कारणांमुळेही ओठ काळवंडतात. जर तुमचेही ओठ काळे पडले असतील तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

आज आम्ही असेच काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा दूर होऊन ओठ निरोगी राहतील. चला जाणून घेऊया अशाच काही सोप्या घरगुती उपायांबद्दल.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

खोबरेल तेल

StyleCrazy.com नुसार, नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे तुमचे ओठ मऊ ठेवण्यास मदत करतात. खोबरेल तेल तुमच्या ओठांना कोरडे आणि काळे होण्यापासून रोखते. तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा ते ओठांवर वापरू शकता.

मध आणि लिंबू

लिंबू मधात मिसळल्याने ओठ मऊ होतात. हे मिश्रण ओठांची घाण काढून काळेपणा दूर करण्यासही मदत करते. एक चमचा लिंबाच्या रसामध्ये मध मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे ओठ स्क्रब करा आणि पाण्याने स्वच्छ धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी दिवसातून एकदा हे मिश्रण वापरा.

कोरफड

कोरफड त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासोबतच ओठांचा काळेपणा दूर करण्यासही मदत करते. अर्धा चमचा एलोवेरा जेल ओठांवर लावा, थोड्या वेळाने ओठ पाण्याने धुवा.

काकडी

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे काळेपणा दूर करण्यासाठी प्रभावी असतात आणि ओठांना ओलावा देखील देतात. त्याच्या वापरासाठी, काकडीचे तुकडे कापून चांगले बारीक करा. ही पेस्ट ओठांवर १५ ते २० मिनिटे लावून पाण्याने धुवा.