आपल्याला माहिती आहे की सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होते. अनेकांना चहाचे तर व्यसनच लागते. तर काहींना सकाळी उठल्याबरोबरच चहा लागतो. पण रिकाम्यापोटी चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हीसुद्धा सकाळी उठल्याबरोबर चहा पित असाल तर वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला देखील अनेक शारीरिक समस्यांचा सामान करावा लागेल.

यासाठी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी चहा पिणे टाळले पाहिजे. यामुळे तुम्हाला कोणता त्रास होऊ शकतो व याचे वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर कोणते होतात याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी चहा पिण्यामुळे होणारे नुकसान कोणते हे पाहू.

उच्च रक्तदाब

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची तक्रार आहे त्यांनी कधीही बेड टी पिऊ नये कारण त्यात असलेले कॅफिन शरीरात विरघळल्याबरोबर रक्तदाब वाढवते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार आणखी वाढू शकतात.

टेन्शन

अनेकदा आपण टेन्शन स्ट्रेस कमी करण्यासाठी सकाळी चहा पितो, पण असे केल्याने टेन्शन अधिक वाढू शकते. वास्तविक, चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे झोप क्षणात निघून जाते, अशा स्थितीत तणाव वाढतो, नंतर हे देखील डोकेदुखीचे कारण बनते.

मंद पचन

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे पचनासाठी चांगले मानले जात नाही कारण त्यामुळे पोटात गॅसची समस्या होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

अल्सर

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास ही सवय आजच सोडा कारण असे केल्याने पोटाच्या आतील भागाला इजा होऊन अल्सर होऊ शकतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या, त्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता.

Leave a comment

Your email address will not be published.