उन्हाळ्यात उष्ण तापमानाचे प्रमाण असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी तुमच्या शरीराला घाम येतो. या घामामुळे तुम्हाला दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी तुम्ही अनेक परफ्यूमचा वापर करता. पण काहीवेळासाठी सुगंध राहतो.

अशा वेळी जर तुम्हालाही घामाच्या वासाने त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून बराच आराम मिळेल. तुम्हाला काय करायचे आहे ते जाणून घ्या.

लिंबू – घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठीही लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. ते वापरण्यासाठी लिंबू अर्धे कापून १० मिनिटे अंडरआर्म्सवर घासून धुवा.

एलोवेरा – थोडेसे एलोवेरा जेल घ्या आणि रात्री अंडरआर्म्सवर लावा. रात्रभर असेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने धुवा, त्यामुळे वासापासून आराम मिळेल.

गुलाब पाणी – अंडरआर्म्स आणि घामाच्या भागावर गुलाब पाण्याचा स्प्रे करा किंवा कापसाच्या मदतीने अंडरआर्म्स स्वच्छ करा. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गुलाबजल टाकून आंघोळ केल्यास घामाच्या दुर्गंधीपासूनही आराम मिळतो.

बेकिंग सोडा- तुम्ही एक चमचा बेकिंग सोडा लिंबाच्या रसात मिक्स करून १५ मिनिटे अंडरआर्म्सवर ठेवू शकता. त्यानंतर चांगली आंघोळ करावी. घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल.

तुरटी- तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. अंघोळ करण्यापूर्वी अंडरआर्म्सवर तुरटी तीन ते चार मिनिटे घासून चांगली धुवा. असे केल्याने अंडरआर्म्सला वास येणार नाही. तुरटी अनेक बॅक्टेरिया नष्ट करण्याचेही काम करते.

Leave a comment

Your email address will not be published.