अनेकांना बाहेर फिरायला गेल्यानंतर खाण्याचा मोहच आवरत नाही. येथील चुकीच्या आहारपद्धती व अशुद्ध पाण्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात. यात डायरिया व लूज मोशन यांसारख्या समस्या वाढतात. यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा शरीरात अशक्तपणाचा त्रास होतो. यावर काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात.

जर तुम्हालाही लूज मोशनची समस्या असेल तर. आज आम्ही तुमची लूज मोशनची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहे. याच्या मदतीने तुम्ही लूज मोशनच्या समस्येतून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ लूज मोशनवर फायदेशीर ठरणारे घरगुती उपायांविषयी.

द्रव आहार घ्या

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता हे लूज मोशनचे सर्वात मोठे कारण आहे. त्याचबरोबर लूज मोशनमुळे शरीरातील पाणी थांबत नाही. अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी फळे आणि भाजीपाल्याचे रस सेवन करावे. यासोबतच लिंबू पाण्यात मीठ आणि साखर मिसळून पिणे देखील फायदेशीर आहे.

आले खा

आल्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक पोटदुखीपासून आराम देण्यासाठी प्रभावी आहेत. अशा परिस्थितीत १ ग्लास दुधात १ चमचा आले पावडर प्यायल्याने आराम मिळेल.

दही प्रभावी होईल

दह्याचे सेवन केल्याने शरीरातील बॅक्टेरियाचे संतुलन राखण्यास मदत होते. दही हेल्दी असण्यासोबतच पोटासाठीही थंड आहे. जे पचनसंस्था दुरुस्त करून लूज मोशनपासून आराम मिळवण्याचे काम करते.

जिरे खा

लूज मोशन थांबवण्यासाठी जिरे खूप फायदेशीर ठरू शकतात. थोडेसे जिरे पाण्यासोबत चघळणे खूप प्रभावी ठरते. व पोट साफ होण्यासाठीही खूप फायदेशीर ठरते.

केळीची मदत घ्या

पोटॅशियम युक्त केळीचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. यासोबतच केळ्यामध्ये असलेले पेक्टिन नावाचे पदार्थ पोटाला बांधून ठेवते. त्यामुळे लूज मोशन आपोआप थांबते.

Leave a comment

Your email address will not be published.