निरोगी राहण्यासाठी आपण छोट्या छोट्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही चांगल्या सवयी पाळल्या तर तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील.

सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया सुधारते आणि त्वचाही निरोगी राहते. चांगली जीवनशैली जगण्यासाठी तुम्ही कोणत्या सवयी फॉलो करू शकता ते जाणून घ्या.

दोन्ही हात चोळा आणि डोळ्यांवर ठेवा
सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम आपले दोन्ही हात चोळा आणि नंतर दोन मिनिटे डोळे झाकून ठेवा. असे केल्याने तुम्हाला आराम वाटेल. ही गोष्ट केल्यावरच तुम्ही अंथरुणावरुन उठता आणि इतर कामे करा.

कोमट पाणी प्या


सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय कोमट पाण्यात थोडे लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यास शरीरातील चयापचय क्रिया चांगली राहते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

थंड पाण्याने डोळे धुवा


सकाळी चेहरा धुताना डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा करा. यामुळे तुमचे डोळे स्वच्छ होतील आणि प्रकाश वाढेल. तोंड धुताना डोळ्यांवर किमान 20-30 वेळा पाणी मारावे.

बीटरूट-गाजरचा रस प्या


हिवाळा ऋतू येत आहे हे तुम्हाला माहीत आहेच. अशा परिस्थितीत चहा किंवा कॉफीऐवजी बीटरूट आणि गाजरच्या रसाने दिवसाची सुरुवात करा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. उन्हाळ्यात बीटरूट आणि गाजर ऐवजी कोरफड, आवळ्याचा रस प्या.