नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तीने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे, हे फोटो शेअर करताना दिशाने लिहिले, ‘हॅलो केल्विन क्लाइन, तुमच्या कुटुंबात परत आल्याने खूप छान वाटत आहे.’

दिशा पटानीचे हे फोटो फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. त्याला 2 तासात जवळपास सहा लाख लाईक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, फोटोंवर 4000 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अमेझिंग, हॉट अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दिशाच्या परफेक्ट फिगरचेही चाहते कौतुक करत आहेत, यासह अनेकांनी दिशा पटानीला ट्रोलही केले आहे.

दिशा पटानीने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या चित्रपटांना चांगलीच पसंती मिळाली आहे. ती नुकतीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. दिशाकडे सध्या एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट आहेत, ती लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.