सध्या इंडस्ट्रीत फक्त अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा होत आहेत. या भव्य लग्नसोहळ्यासाठी सर्वजण उत्साही पाहायला मिळत आहेत. इंडस्ट्रीमधून अनेकांनी या जोडप्याला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली आहे. यात आता चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने रणबीर आलियाच्या लग्नावर आपली प्रतिक्रिया देत दोघांना आशीर्वाद दिला आहे.

करण जोहरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत बॉलीवूडच्या हॉट कपलला शुभेच्छा देताना लिहिले की, ‘प्रेम हलके आहे, मला माहित आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांचे आयुष्य तुमच्या प्रेमाने भरले आहे. नवीन सुरुवातीसाठी खूप प्रेम.’ यासोबतच त्याने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची एक क्लिपही शेअर केली आहे. करणची ही पोस्ट सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे.

दरम्यान, आलिया आणि रणबीर हे अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहेत. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक लग्नाला उपस्थित राहणार आहेत आणि या लग्नात फक्त एक किंवा दोन फंक्शन असतील. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनी 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारल्या आणि आई-वडिलांप्रमाणेच रणबीर कपूरही चेंबूरमधील कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर असलेल्या आरके हाऊसमध्ये सात फेऱ्या मारणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.