आजकाल मधुमेह रुग्णाचे प्रमाण खूप वाढले आहे. आहाराच्या चुकीच्या पद्धती, बदलती जीवनशैली यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते यामुळे मधुमेह हा आजार होतो. पण मधुमेहींसाठी शरीरात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे एक मोठे आव्हानच असते. जर यावर योग्य आहार घेतल्यास ही रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

यासाठी आज आम्ही अशी काही फळे सांगणार आहोत, याने मधुमेहींना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊ मधुमेहींसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या फळांबाबत.

पेरू

डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हे सुपर फूड मानले जाते. पेरूतील फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, पेरूमध्ये आहारातील फायबर जास्त प्रमाणात असते. या फळाचा ग्लुकोज इंडेक्सही कमी असतो.

संत्रा

व्हिटॅमिन सी ने भरलेली संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होतेच पण मधुमेहाचा धोकाही कमी होतो. संत्रा आणि गुसबेरी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांचाही GI स्कोअर कमी असतो.

जांभूळ

मधुमेहींसाठी हे सर्वोत्तम फळ आहे. रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यासोबतच शुगर नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. मधुमेही रुग्णही जांभळाच्या बियांचे चूर्ण करून सेवन करू शकतात.

किवी

मधुमेही रुग्णाच्या आहारात किवीचा समावेश केला जाऊ शकतो कारण ते साखरमुक्त फळ मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिटॅमिन सी सोबतच यामध्ये साखर कमी असते, त्यामुळे याचे सेवन केल्याने व्यक्तीला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. याशिवाय यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक आढळतात जे आरोग्याला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात.

सफरचंद

सफरचंदांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात, जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, पाचन तंत्र स्वच्छ करण्यास आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात. याशिवाय सफरचंदात असलेले पोषक घटक चरबीच्या पचनासही मदत करतात.

Leave a comment

Your email address will not be published.