आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 32 वा सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 116 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे दिल्लीने 11व्या षटकात गाठले.

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली सुरुवात केली. या दोघांनी मिळून पॉवरप्लेमध्ये 81 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जच्या एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही. पॉवरप्लेमध्ये डेव्हिड वॉर्नरने 36 आणि पृथ्वी शॉने 40 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून राहुल चहरला पृथ्वी शॉच्या रूपाने पहिली विकेट मिळाली. पृथ्वी शॉ 41 धावांवर बाद झाला.

डेव्हिड वॉर्नरने आपला खेळ सुरु ठेवला आणि अर्धशतक झळकावले. डेव्हिड वॉर्नर आणि सरफराज खान यांनी मिळून दिल्लीला लक्ष्य केले. डेव्हिड वॉर्नरने 30 चेंडूत 60 धावा केल्या, ज्यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार लगावला.

नाणेफेक गमावून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पंजाब किंग्जचा डाव पहिला शिखर धवन 9 धावा करून बाद झाला, त्यानंतर कर्णधार मयांक अग्रवाल 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंजाब किंग्जच्या पहिल्या विकेटसाठी धवन आणि अग्रवाल यांनी 33 धावा केल्या. पंजाब किंग्जचा डाव ही जोडी बाद झाल्यानंतर गडगडला. पुढे फांदाजीसाठी आलेल्या जॉनी बेअरस्टो (9), लियाम लिव्हिंगस्टोन (2), वेगवान फलंदाजांनी स्वस्तात विकेट गमावल्या.

शाहरुख खान आणि जितेश शर्मा यांनी 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, पण जितेशच्या विकेटनंतर पंजाब पुन्हा एकदा मागे पडला. पंजाब किंग्जच्या इनिंगमध्ये जितेशने 23 चेंडूत 32 आणि शाहरुख खानने 20 चेंडूत 12 धावा केल्या. पंजाब किंग्जच्या डावातील राहुल चहरनेही 12 चेंडूत 12 धावा करत धावसंख्येला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली. पंजाब किंग्जचा डाव 115 धावांवर सर्वबाद.

फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने 4 षटकात फक्त 10 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे बळी घेतले. अक्षरने लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्माला आपल्या जाळ्यात ओढले. कुलदीप यादवने 4 षटकात 24 धावा देत 2 बळी घेतले. खलील अहमद आणि ललित यादव यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.

Leave a comment

Your email address will not be published.