मुंबई : दीपिका पदुकोण क्वचितच तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करते. अलीकडेच, तिने आई उज्जला पदुकोण आणि बहीण अनिशा पदुकोणसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहे, ज्यामध्ये चाहते रणवीर सिंगला शोधत आहेत.
दीपिका पदुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सद्वारे ती चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते. अलीकडेच, ती रणवीर सिंगला सोडून तिची आई उज्जला पदुकोण आणि बहीण अनिशा पदुकोणसह व्हेनिसला पोहोचली आहे, जिथे तिने चाहत्यांसाठी संध्याकाळचे काही दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.
दीपिका तिच्या कुटुंबावर किती प्रेम करते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. आई-वडिलांना भेटण्यासाठी ती अनेकदा पुण्याला जात असते. अलीकडेच ती तिची आई आणि बहिणीसोबत सुट्टी घालवण्यासाठी इटलीतील प्रसिद्ध कॅनाल सिटी व्हेनिस येथे पोहोचली.

पहिल्या फोटोमध्ये दीपिका चेहऱ्यावर मास्क घातलेली दिसत आहे. अनिशा राखाडी रंगाच्या पोशाखात कॅमेऱ्याकडे पाहत आहे, तर आई उज्जला काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे.