नवी दिल्ली : भारताचा टी-20 स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज दीपक चहरला (Deepak chahar) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागतील. या दुखापतीमुळे तो संपूर्ण इंडियन प्रीमियर लीग (IPL) हंगामातून बाहेर पडला होता. याचा अर्थ इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी संघात त्याचा समावेश केला जाणार नाही.

चहर आणि दुसरा केंद्रीय करार असलेला क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदर हाताच्या दुखापतीतून सावरत आहेत. या दोन्ही खेळाडूंचे टी नटराजन यांच्यासह राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचार सुरू आहे.

फिरकी अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन इंग्लंडच्या काउंटी संघ लँकेशायरचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “वॉशिंग्टन पूर्ण तंदुरुस्तीच्या जवळ आहे आणि त्याला फक्त गती मिळविण्यासाठी मैदानात वेळ घालवावा लागेल.” तो लँकेशायरकडून खेळणार आहे. हे त्याच्यासाठी फायद्याचे आहे.

दीपक चहर अपडेट

कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान जखमी झालेला चहर एनसीएमध्ये उपचार घेत आहे, आणि तो सध्या चांगल्या स्थितीत दिसत आहे. फिटनेस उपडेट देताना त्याने पीटीआय सांगितले, “मी सध्या माझ्या वेळापत्रकानुसार एका वेळी चार ते पाच षटकांचा गोलंदाजी व्यायाम करत आहे. माझी रिकव्हरी खूप चांगले होत आहे आणि मला वाटते की मला सामन्यासाठी आवश्यक असलेला फिटनेस परत मिळवण्यासाठी आणखी चार ते पाच आठवडे लागतील.” असे खेळाडूने स्पष्ट केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.