महाअपडेट टीम : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीस अवघे काही दिवस उरले आहेत. नव्या महिन्यात सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. माचीससह दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी महाग होणार आहेत. 1 डिसेंबरपासून काय महाग होणार आहे ते जाणून घेऊया.
माचीस होणार महाग :
1 डिसेंबरपासून माचीसच्या किमतीत 5 रुपयांनी वाढ होणार आहे. या वाढीनंतर माचिसच्या किमतीत तब्बल 14 वर्षांनंतर दरात वाढ होऊन 1 रुपयांची माचीस 1 रुपयाला झाली आहे. या – आधी 2007 मध्ये माचीसच्या किमतीत 50 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
PNB ग्राहकांना धक्का :
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) आपल्या बचत खातेधारकांना मोठा धक्का दिला आहे. बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. आता वार्षिक व्याजदर 2.90 % वरून 2.80 % वर आला आहे. 1 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत.
SBI क्रेडिट कार्ड महाग :
देशातील सर्वात मोठी बँक SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असेल तर 1 डिसेंबरपासून मोठा झटका बसणार आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक खरेदीवर 99 रुपये आणि टॅक्स स्वतंत्रपणे भरावा लागेल आहे. हा प्रोसेसिंग चार्ज म्हणून भरावा लागणार आहे.
LPG च्या किमतीतही होणार वाढ :
डिसेंबर महिन्यात LPG गॅसच्या किमतीतही बदल होऊ शकतो. LPG च्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय ATF म्हणजेच जेट इंधनही महाग होण्याची शक्यता आहे.