मुंबई : दिवस आणि वर्षे निघून जातात, पण गेलेल्यांच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. दोन वर्षांपूर्वी ३० एप्रिल रोजी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत, कुटुंबियांसह चाहतेही आजही त्यांच्या आठवणी ताज्या ठेवतात.
नीतू कपूर सध्या कलर्स टीव्हीवर सुरू झालेल्या ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’ या नवीन रिअॅलिटी शोला जज करत आहे. आगामी शोमध्ये मुले त्यांच्या अभिनयाद्वारे ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहताना दिसणार आहेत. या शोमध्ये पुन्हा एकदा नीतू कपूर ऋषी कपूर यांची आठवण काढून भावूक होताना दिसली.
‘डान्स दिवाने ज्युनियर्स’मध्ये, 30 एप्रिल रोजी शनिवारी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. एपिसोड शूट झाला आहे. शूटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नीतू कपूर त्यांच्या आठवणीत भावूक होताना दिसत आहे.
वास्तविक, बानी नावाची एक स्पर्धक तिच्या डान्स मूव्ह्सने जजना चकित करते. मुलीचा परफॉर्मन्स संपल्यावर बानीची आजी नीतू कपूरला खास गिफ्ट देते. यावेळी ति सांगते की, “1974 मध्ये ऋषी कपूर यांना भेटले होते आणि अभिनेत्याने त्यांना नेहमीच मदत केली. या सगळ्यानंतर तिने ‘लंबी जुदाई’ हे गाणेही गायले, जे ऐकून ती भावूक झाली.”
नीतू ओल्या डोळ्यांनी म्हणते, “ऋषीजी आता राहिले नाहीत, पण मी रोज कोणाला ना कोणाला भेटते आणि कोणीतरी मला त्यांची आठवण करून देते. ऋषीजी माझ्याशी कुठूनतरी जोडलेले आहेत. नीतूचे बोलणे ऐकल्यानंतर, शोचा होस्ट करण कुंद्रा म्हणतो, ‘काही लोकांच्या हृदयात जागा बनवतात आणि काही लोक ऋषीजी सारखे जे स्वतःच हृदय बनतात”.
ऋषी कपूर यांचे दोन वर्षांपूर्वी ३० एप्रिल रोजी निधन झाले होते. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 2018 पासून ते कॅन्सरशी लढा देत होते. या लढाईत त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी त्यांना साथ दिली. न्यूयॉर्कमध्ये 1 वर्ष उपचार घेतल्यानंतर ते 2019 मध्ये भारतात परतले.