महा – अपडेट टीम, 21 मे 2022 :- स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाले आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आयुर्वेदात औषध म्हणूनही मसाल्यांचा वापर केला जातो. तुम्ही कुठलीतरी भाजी किंवा डिश बनवण्यासाठी जिरे आणि दालचिनीचा वापर केला असेल. पण या मसाल्यांचे सेवन केल्याने शरीरासाठी होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

खरं तर जिरे आणि दालचिनीचे वेगवेगळे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु हे दोन्ही मसाले एकत्र वापरल्यास ते शरीरातील अनेक समस्या दूर करण्याचं काम करतात. जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म पोट आणि पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहेत, तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि चयापचय ठीक करण्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर मानली जाते.

दालचिनी अन् जिऱ्याचं पाणी प्यायल्याने फक्त वजन कमी करण्यातच फायदा होत नाही, तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ते उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया जिरे आणि दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे आणि बनवण्याची पद्धत…

जिरे आणि दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे :-

जिरे आणि दालचिनीचे पाणी पिणे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराच्या पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर खूप फायदेशीर असतात. याचे सेवन केल्याने पोटात जळजळ, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांवर फायदेशीर ठरते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनसंस्था मजबूत आणि निरोगी असणे आवश्यक आहे.

त्यामुळे तुम्ही दररोज जिरे आणि दालचिनीपासून बनवलेले पाणी सेवन करू शकता. दुसरीकडे, दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात. याचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फायदा होतो. जिरे आणि दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत…

  1. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :-

वजन कमी करण्यासाठी जिरे आणि दालचिनीचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आजच्या काळात लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणारे वजन शरीराला अनेक गंभीर आजारांना बळी पडते. अशा स्थितीत वजन संतुलित ठेवायचे असेल तर रोज जिरे आणि दालचिनीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. शरीरातील पाणी साठवून ठेवण्याची समस्या कमी करण्यासाठी आणि चयापचय समस्या दूर करण्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरते…

  1. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त :-

दालचिनीमध्ये असलेले गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. दालचिनी आणि जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळतं तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. दालचिनीमध्ये असलेले गुणधर्म जास्त चरबीयुक्त पदार्थांमुळे शरीराला मिळणारे फॅट्स कमी करण्याचे काम करतं…

  1. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी उपयुक्त :-

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी दालचिनी आणि जिऱ्याचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. जिरे पोटासाठी खूप उपयुक्त आहे. उन्हाळ्यात पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी लोक अनेकदा याचे सेवन करतात. जिर्‍यामध्ये क्युमिनल्डिहाइड आणि फ्लेव्होनॉइड गुणधर्म असतात, जे अँसिडिटी, बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जातात. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी जिरे आणि दालचिनीचे पाणी रोज प्यावं…

  1. जळजळ होण्याच्या समस्येत फायदेशीर :-

दालचिनी आणि जिरे यांचे पाणी पिणे शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. जळजळ हृदयरोग, संधिवात आणि पोटाच्या समस्यांना कारणीभूत ठरते. दालचिनीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म जळजळ होण्याची समस्या दूर करण्याचे काम करतं.

  1. मधुमेहींसाठी तर वरदानचं :-

मधुमेहींसाठी दालचिनी आणि जिरे पाणी खूप फायदेशीर आहे. संशोधनानुसार दालचिनीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. तसेच, जिऱ्यामध्येही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत या दोन गोष्टींचे एकत्र सेवन केल्यास ते मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं.

जिरे आणि दालचिनीचे पाणी कसे बनवायचे :-

जिरे आणि दालचिनीचे पाणी तयार करण्यासाठी…

सर्वप्रथम, दालचिनी आणि जिरे समान प्रमाणात घ्या आणि स्वच्छ पाण्यात भिजवा.
हे पाणी रात्रभर झाकून ठेवा.
सकाळी पाणी चांगले उकळून गाळून घ्यावे.
आता थोडा वेळ थंड होऊ द्या.
त्यानंतर सकाळी अनुशापोटी याचे सेवन करा.
असे केल्याने तुम्हाला वरील समस्यांमध्ये फायदा होईल.

दालचिनीचे जास्त प्रमाणात सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून, आपण ते घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा…

Leave a comment

Your email address will not be published.