आलमगीर येथील शहा कॉलनी येथे मारहाण झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुन्नी मस्जिद समोर ही घटना घडली असून या हाणामारीत दोघे जखमी झाले आहे. तर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहिली फिर्याद
आफरीन मुसा शेख (वय 30 रा. आलमगीर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहीद (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी वाहीद याने फिर्यादीचा पती प्रतिक पांडुरंग आतकर याला गाडीवर बसवून नेले व सुन्नी मस्जिद समोर त्याच्या डोक्याचा बाजूला, हातावर, खांद्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी फिर्याद
वाहिद जावेद काकर (रा. आलमगीर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आफरीन शेख व प्रतीक आतकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आफरीन हिने शिवीगाळ केल्याचे व तिचा पती प्रतिक याने वाहिद याला धारदार हत्याराने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *