हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे लोकांना लहान- मोठ्या आजारांना सामोरं जावा लागते. यात सर्दी बरोबरच खोकल्याचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. त्रासदायक असणारा हा खोकला काही गोष्टींच्या सेवनानेही कमी करता येऊ शकतो.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याच्या सेवनाने तुमचा सर्दी- खोकल्याचा त्रास नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत होईल. चला जाणून घेऊया खोकल्यापासून आराम मिळवून देणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत.

खोकल्याच्या समस्येवर मध

खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मध घ्या. मधामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात, ज्यामुळे तुम्ही अनेक समस्यांवर मात करू शकता. तुम्ही ते गरम दूध किंवा गरम चहामध्ये मिसळून सेवन करू शकता. मधाचे सेवन केल्याने तुम्ही घसादुखी आणि खोकल्याची समस्या कमी करू शकता.

गुळाच्या मदतीने खोकला दूर होईल

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळाचे सेवन करणे आरोग्यदायी ठरू शकते. त्यामुळे खोकल्याचा त्रास कमी होऊ शकतो. खोकला झाल्यास तुम्ही चहा, शेंगदाणे किंवा तीळ सोबत गुळाचे सेवन करू शकता. याशिवाय आले गरम करून गुळासोबत खावे. याच्या मदतीने खोकल्याची समस्या दूर होऊ शकते.

दालचिनीने मिळेल आराम

खोकला असेल तेव्हा दालचिनीचे सेवन केले जाऊ शकते. हे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळे खोकला आराम मिळतो. तुम्ही ते गरम पाण्यात किंवा भाज्यांमध्ये मसाल्याच्या स्वरूपात खाऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही कोरडा खोकला आणि घसादुखीपासून मुक्त होऊ शकता.

कच्च्या लसणाचे सेवन

खोकला झाल्यास कच्चा लसूण खाऊ शकतो. हे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे घसा खवखवणे आणि जळजळ कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. याशिवाय कच्चा लसूण तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

अननसाने खोकला होईल कमी

खोकला आल्यावर अननसाचे सेवन करा. अननस खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे खोकला आणि श्लेष्माचा त्रास नैसर्गिकरित्या कमी होतो.

खोकल्यामध्ये लवंगाचे सेवन

खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लवंगाचे सेवन केले जाऊ शकते. लवंग हिवाळ्यात होणार्‍या अस्वस्थतेपासून आराम देऊ शकते. लवंगमध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे खोकला कमी होतो.