आजकाल बऱ्याच लोकांमध्ये वाढत्या वजनाची समस्या सतावत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. अनेकजण जिम, व्यायाम, यांसारखे मार्ग अवलंबतात. पण वजन कमी करणे एवढे सोपे नसते.

जर तुम्हीदेखील हे सगळे करून बसला असाल आणि फरक जाणवला नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश करू शकता. अंड्यांसोबत या तीन गोष्टींचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल…

अंडी खाल्ल्याने वजन कमी होते का?

अंडी हे प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, चरबी आणि ओमेगा -3 ने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही ते उकडून, भुर्जी किंवा अंड्याची करी बनवून सेवन करू शकता. याचे सेवन केल्याने तुम्हाला उत्साही वाटेल आणि तुमचे पोटही दीर्घकाळ भरले जाईल.

काळी मिरी

अंड्यावर लाल तिखट खाल्लं असेलच, पण वजन कमी करायचं असेल तर अंड्यात काळी मिरी टाका. यामुळे चव वाढेल आणि वजनही कमी होईल. काळ्या मिरीमध्ये आढळणारे पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

शिमला मिर्ची

ऑम्लेटमध्ये सिमला मिरची टाकू शकता. तसेच वजन कमी करण्यास मदत होईल. सिमला मिरचीमध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करतात. सिमला मिरची खाल्ल्याने चवही वाढते. तसेच ते तुम्हाला निरोगी ठेवते.

खोबरेल तेल

तुम्ही नारळाचे तेल अंड्यात मिसळून खाऊ शकता. ऑम्लेट किंवा भुर्जी बनवण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅट नगण्य असते, जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अंड्यासोबत खोबरेल तेल वापरू शकता.