प्रत्येक नववधू व नववराला आपल्या लग्नात सुंदर दिसण्याची इच्छा असते.यासाठी लग्नामध्ये चेहरा सुंदर व चमकदार ठेवण्यासाठी अनेकजण खूप प्रयत्न करत असतात. त्यासाठी बाजारातील महागड्या रायसायनिक असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करातात. याने चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते.

याऐवजी आपण नैसर्गिक असलेल्या कॉफी फेशियलने चेहरा सुंदर व चमकदार बनवू शकतो.लग्नाच्या वेळी चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी कॉफी फेशियल खूप फायदेशीर ठरते.

यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत व कॉफी फेशियल कसा बनवायचा हे सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही चेहरा कमी वेळात सुंदर व चमकदार बनवू शकता.

फेशियल

क्लींजिंग करण्यासाठी, प्रथम तुम्हाला चेहरा स्वच्छ करावा लागेल.

यासाठी तुम्ही एक चिमूटभर कॉफी घ्या. त्यात दोन चमचे कच्चे दूध आणि एक चमचा एलोवेरा जेल घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून एक मिनिट मसाज करा आणि नंतर धुवा, जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्रीम देखील वापरू शकता. तेलकट त्वचेसाठी कच्चे दूध सर्वोत्तम आहे.

स्क्रब करणे

कॉफी स्क्रबिंग करण्यासाठी तुम्हाला एक चमचा तांदळाचे पीठ घ्यावे लागेल. त्यात एक चमचा कॉफी घाला. त्यात चिमूटभर हळदही टाका. त्यात थोडे पाणी घाला आणि नंतर स्क्रबिंग करा. स्क्रब करताना चेहऱ्याला जास्त चोळू नका.

वाफ घेणे

वाफ घेण्यासाठी तुम्ही स्टीमर वापरू शकता किंवा भांड्यात पाणी गरम करून तोंडावर टॉवेल ठेवून वाफ घेऊ शकता. यामुळे तुमच्या त्वचेतील घाण निघू शकते.

फेस मास्क

फेस मास्क बनवण्यासाठी आधी दोन चमचे कॉफी घ्या. त्यात एक चमचा दही घाला. हा फेस मास्क २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. तुम्हाला फेसमास्क घासण्याची गरज नाही. यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.

Leave a comment

Your email address will not be published.