आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलने आयपीएल 2022 मेगा लिलावात आपले नाव दिले नाही. ख्रिस गेल 42 वर्षांचा आहे आणि या वयात ख्रिस गेलला फ्रँचायझी विकत घेण्यास इच्छुक असण्याची शक्यता नाही. पण, याचदरम्यान ख्रिस गेलने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ख्रिस गेलने इंस्टाग्राम स्टोरीवर वर्कआऊट करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करण्यासोबतच ख्रिस गेलने लिहिले की, ‘IPL 2023 ची तयारी करत आहे. ख्रिस गेलने शेअर केलेली स्टोरी पाहून चाहतेही त्याला आयपीएलमध्ये बघण्यास उत्सुक आहेत.
ख्रिस गेल आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत ख्रिस गेलने गंमतीने ही पोस्ट शेअर केली असेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. दुसरीकडे, ख्रिस गेलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 142 आयपीएल सामन्यांमध्ये या अनुभवी फलंदाजाने 39.72 च्या सरासरीने 4965 धावा केल्या आहेत.
यादरम्यान ख्रिस गेलचा स्ट्राइक रेटही 148.96 राहिला आहे. ख्रिस गेलनेही आयपीएलच्या इतिहासात 357 षटकार ठोकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये ख्रिस गेल पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसला होता. मात्र, तो हंगाम गेलसाठी काही खास ठरला नाही. त्यावेळी पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुल होता.