रत्नागिरी दि. १६ :  रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरीबुवा संस्थान येथे भेट देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देव भैरीबुवा दर्शन घेतले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

यावेळी मंदीर संस्थानतर्फे फेटा बांधून व परंपरागत पध्दतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंदीर संस्थानचे श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, दुरदर्शनचे माजी निर्माता जयु भाटकर,  देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.