मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून उद्या गुरूवार दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  प्रसारित होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने सुपर ५० हा उपक्रम नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून जेईई (JEE) आणि आयआयटी (IIT) तसेच स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन या उपक्रमातून केले जाणार आहे. ‘सुपर ५०’ हा उपक्रम काय आहे, या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रवेश पूर्व निवड चाचणी परीक्षेचे स्वरूप काय आहे.

याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. सहायक संचालक मोहिनी राणे यांनी ही मुलाखत घेतली आहे.