karishma
Charisma hugs Salman, wishes him a happy Eid, fans demand marriage

मुंबई : सलमान खानची (salman khan) बहीण अर्पिता खान (arpita khan) आणि तिचा पती आयुष शर्मा (ayush sharma) यांनी ईदनिमित्त एका ग्रँड पार्टीचे आयोजन केली होती.

या पार्टीत दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, अनिल कपूर, संजय कपूर, शनाया कपूर, करिश्मा कपूर यांसारखे स्टार्स उपस्थित होते. करिश्माने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचे सुंदर फोटो शेअर करून सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करिश्मा कपूर आणि सलमान खान यांनी 90 च्या दशकात काही सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. करिश्मा कपूर आणि सलमान खान यांनी ‘बीवी नंबर 1’, ‘जुडवा’, ‘जीत’, ‘अंदाज अपना अपना’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सलमानसोबतच्या ईदच्या पार्टीदरम्यान अभिनेत्रीने काही आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले.

करिश्मा कपूरने इन्स्टाग्रामवर सलमान खानसोबतचे तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. करिश्मा आणि सलमान खूपच सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “OG सोबत परत… सर्वांना ईद मुबारक, नेहमीच बेस्ट फ्रेंड”.

करिश्मा कपूर आणि सलमान खानच्या सुंदर फोटोवर चाहते आणि सेलिब्रिटी ईदच्या शुभेच्छा देत आहेत. त्यांची जोडी एकत्र पाहण्याचे आवाहन करत एका चाहत्याने लिहिले, ‘तुम्ही दोघेही प्रत्येक चित्रपटात खूप छान दिसत होता. याशिवाय काही चाहत्यांनी दोघांना ‘कृपया लग्न करा’ असा सल्लाही दिला आहे. ‘तुम्ही दोघेही ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन बेस्ट कपल दिसता’.

Leave a comment

Your email address will not be published.